मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात बिझी अभिनेत्यांमध्ये अक्षयकुमारचा समावेश होतो. नुकताच त्याचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. त्यानंतर आता अक्षय नवीन चित्रपटाच्या तयारीत आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित करत असलेल्या ‘राम सेतू’ या चित्रपटात अक्षय दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक लोकांसमोर आला. त्यात अक्षय कुमार एका सामान्य माणूस म्हणून दिसत आहे. तर मागे प्रभू रामचंद्रांचे पोस्टर आहे.
भगवान राम यांना लोकांच्या आठवणीत जिवंत ठेवण्यासाठी तसेच हा वारसा पुढील पिढीपर्यंत व्यवस्थित पोहोचावा यासाठी हा चित्रपट म्हणजे आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. या पोस्टरसोबत ही माहिती देत अक्षयकुमारने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अरुण भाटिया आणि विक्रम मल्होत्रा हे दोघे एकत्रितरित्या या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी हे क्रिएटिव्ह निर्माता म्हणून काम पहात आहेत. अक्षय कुमारच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटाला हॉटस्टारवर सर्वाधिक व्ह्यूअरशिप मिळाली आहे.