नाशिक – शहराचे प्रथम नागरिक महापौर सतीश कुलकर्णी यांचे शासकीय निवासस्थानी रामायण येथे अगदी साध्या पद्धतीने गणपतीची स्थापना करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अतिशय साध्या पद्धतीने रामायण येथे श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. कुलकर्णी यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करून आरती केली. याप्रसंगी रामायण येथील कर्मचारीवृंद तसेच समाधान देवरे व हिरामण रोकडे हे उपस्थित होते.
![IMG 20200822 WA0012](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20200822-WA0012.jpg)