नाशिक- किल्ले अजिंक्य रामशेजवर शनिवारी, रविवारी हजारो पर्यटकांची गर्दी असते.या पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला बघण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने किल्ल्यावर काही टवाळ व उपद्रवीकडून किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तुना धोका निर्माण होत आहे,पर्यटकांना डोकेदुखी असलेला किल्ल्यावर टवाळांचा कायमच असणारा वावर थांबवावा याबाबत रामशेजवरील ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणासाठी तातडीने उपाय योजावे अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे व पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक आरती आळे, आशेवाडी ग्रामपंचायत कार्यालय यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, किल्ले रामशेज नाशिकपासून अवघा १२ किलोमीटरवर पेठरोड लागत हा दुर्ग आहे, अवघ्या ३३० मावळ्यांनी ६ वर्षे रामशेजला वेढा देऊन बसलेल्या हजारो मुघली फौजेची दाणादाण उडवून रामशेज अजिंक्य राखला होता.याच पराक्रमाचे प्रतीक असलेला दुर्ग रामशेज अत्यंत महत्वाचा मूर्तिमंत वारसा आहे त्याला जीवापाड जपण्यासाठी व त्याचे अस्तित्व वाचवण्यासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था गेल्या अनेक वर्षे रामशेजवर अखंड दुर्गसंवर्धन श्रमदान मोहिमा घेत आहेत, किल्ल्यावर असलेला चुन्याचा घाना,स्वच्छ गोमुखी द्वार,माथ्यावरील सैनिकांचे जोते,व त्याठिकाणी लावलेले चाफ्याची २०० झाडे,उरलेल्या तट,बुरुजांचे माती, दगडे दाबून केलेले भक्कमीकरण, प्लॅस्टिकमुक्त दुर्ग,किल्ल्यावर असलेल्या १८ जलाशयांचे पूर्ण संवर्धन असे कित्येक कामे श्रमातून केली आहे,पर्यटकांसाठी भक्कम असे दिशादर्शक फलक ही लावण्यात आले आहे,मोहिमेच्या दिवशी दुर्गप्रेमींसाठी दुर्गजागृती अभियान,रामशेजवर साजरा होणारा रामशेज महोत्सव,छत्रपती शंभू राजे जयंती,,असे सततचे उपक्रम व संवर्धन मोहिमांच्या मोहिमा करून किल्ला अबाधित राखण्याचे काम स्वखर्चाने कष्टाने केले आहे,मात्र किल्ल्यावरील दिवसागणिक वाढती गर्दी बघता किल्ल्यावर सुरक्षित पर्यटन व्हावे यासाठी अधिकृत गाईड नाही,किल्ल्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन पोलीस ही किल्ल्यावर नसतात,त्यामुळं असुरक्षित पर्यटकांना टवाळ मंडळींकडून त्रास होतो,तसेच ऐतिहासिक कुंड व टाक्यांत ही मंडळी अंघोळी करतात,स्वच्छ पाणी यामुळं दूषित होते,सेल्फी बंदी असताना किल्ल्यावर बिनधास्त सेल्फी काढणे सुरू असते,काहीजण तट बुरुजावर ही चढतात,मग प्रसंगी अपघातही होतो,तर किल्ला माथ्याच्या झेंडा मैदानावर टाक्यांत गांधील माश्यांचे पोळे असल्याने येथेही कित्येकदा पर्यटक माश्या चावल्याने जखमी झाले होते,दरवर्षी उपद्रवी दारुडे किल्ल्यावर येतात व वणवे ही लावतात किल्ला सातत्याने जाळण्याचे प्रकार थांबवण्यासाठी रामशेजवर कायमचा वनपाल नेमावा,किल्ल्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंदणीसाठी वन विभागाने पायथ्याला चौकी उभारावी अश्या अनेक मागण्या शिवकार्य गडकोटचे वतीने संस्थापक राम खुर्दळ आणि कार्यकर्ते यांनी लेखी स्वरूपात संबंधितांना दिल्या.
मनोहर मोरे देशमुख हे हतगडचे मुळ किल्लेदार गंगाजी मोरे देशमुख यांचे १३ वे वंशज असून त्यांनी सांगितले की, दुर्ग रामशेजच्या तग धरून उरलेल्या वास्तू त्या किल्ल्याचे वैभव आहे या बागलाणचा ग्रीब्ज या इंग्रज अधिकाऱ्याने जिल्ह्यातील दुर्ग १८१८ नंतर सुरुंग लावून उध्वस्त केले रामशेज ही त्यात उध्वस्त केला गेला,उरलेल्या वास्तू कित्येक दिवस दुर्लक्षित भग्न आहेत,प्रभू रामाची शेज असलेला रामशेज जीवापाड जपणारी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या अपार कष्टाने रामशेजसह जिल्ह्यातील कित्येक दुर्ग आज तग धरून आहेत,हा वारसा जपण्याकडे मात्र शासकीय सामाजिक लक्ष नसतांना हे दुर्ग वाचवणे सर्वांचेच कर्तव्य आहे.ते प्रत्येकाने करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.