पॅरिस ः राफेल या लढाऊ विमान बनवणाऱ्या कंपनीचे मालक फ्रान्समधले मोठे उद्योगपती ओलिवियर दसॉल्ट यांचा एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. ते ६९ वर्षांचे होते. दसॉल्ट यांच्या खास हेलिक्टॉप्टरमधून जाताना रविवारी ते नॉर्मडीमध्ये अपघातग्रस्त झाले.
दसॉल्ट हे फ्रान्सच्या संसदेचेही सदस्य होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी शोक व्यक्त केला आहे. अब्जावधींच्या संपत्तीचे मालक असलेले सर्ज दसॉल्ट यांचे ते सर्वात मोठे पुत्र होते. राजकीय कारणं आणि हितांमुळे त्यांनी दसॉल्ट बोर्डातून आपलं नाव मागे घेतलं होतं. २०२० च्या फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत दसॉल्ट यांना त्याच्या दोन भाऊ आणि एका बहिणासोबत ३६१ वे स्थान मिळाले होते.
दसॉल्ट यांच्या कंपनीचेच राफेल
भारताला मिळालेले राफेल हे लढाऊ विमान दसॉल्ट एव्हिएशन कंपनीनं बनवले आहे, ही कंपनी ओलिवियर दसॉल्ट यांती आहे. त्यांच्या वडिलांनी ही कंपनी स्थापन केली होती. दसॉल्ट ग्रुपची ही उपकंपनी आहे. भारतीय हवाई दलाच्या गोल्डन अॅरोज तुकडीत १६ ओम्नी रोल राफेल जेट लढाऊ विमाने येत्या एप्रिलमध्ये दाखल झाल्यावर दलाच्या मारक क्षमतेला बळ मिळेल. फ्रान्सची सर्वात मोठी जेट इंजिन निर्माती सॅफ्रॅन लढाऊ विमानांची इंजिने आणि दुय्यम भाग भारतात बनवण्यास तयार आहे,