शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार

by India Darpan
सप्टेंबर 2, 2020 | 10:28 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200902 WA0027

नाशिक – सामान्य नागरिकांचे प्रश्न विभागस्तरावर तात्काळ निकाली काढण्यासाठी विभागाचे काम नियोजनपद्धतीने करण्यावर भर देणार असून शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी विभागीय आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून मध्यान्हपूर्व राधाकृष्ण गमे यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी ते बोलत होते.
विभागीय आयुक्त कार्यालयातील समितीदालनात विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनिर्वाचित विभागीय आयुक्त गमे बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी, उपायुक्त (सामान्य प्रशासन) रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, महसुल प्रबोधिनीच्या संचालिका गीताजंली बाविस्कर , नगर विकास विभागाच्या प्रादेशिक उपसंचालक संगीता धायगुडे, प्रभारी उपायुक्त प्रतिभा संगमनेरे, अरुण आनंदकर, नियोजन विभागाचे उपायुक्त प्रदीप पोतदार, नगररचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे, विकास विभागाचे उपायुक्त अरविंद मोरे उपस्थित होते.
गमे म्हणाले kr, विभागाचा आढावा घेत असतांना प्रधान्याने विभागातील कोरोनाची स्थिती जाणून घेवून ज्या ठिकाणी पायाभुत सुविधा कमी असतील त्या ठिकाणी रुग्णांना आरोग्य विषयक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या मुख्य योजनांपैकी शेतकरी पीक कर्ज वाटप व महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत, विभागीय आयुक्त गमे यांनी व्यक्त केले.
 जिल्हानिहाय आढावा घेणार
विभागातील शासकीय कामांना व शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांना गती देण्यासाठी पुढील आठवड्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांना भेटी देवून त्यांचा आढावा घेवून पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे गतिमान
नवनिर्वाचित विभागीय आयुक्त यांनी उपायुक्त व सर्व विभाग प्रमुखांना तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे गतिमान करण्याबाबत सूचित केले. तसेच प्रत्येक कामाचे नियोजन करतांना तीन टप्प्यात करुन त्यामध्ये  दैनंदिन आवश्यक कामे त्याच दिवशी  निकाली काढावीत, आठवड्याची कामे आठवड्यात तर  महिन्याभराचा कालावधी असलेली कामे महिन्याभरात निकाली काढावीत. तसेच प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या विभागाच्या कामाच्या माहितीची टिपणी व मागील झालेल्या बैठकांचे इतिवृत्त सादर करण्याच्या सूचना गमे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
नवनिर्वाचित विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याआधी नाशिक महानगरपालिकेचा महानगरपालिका आयुक्त पदाचा यशस्वी कार्यभार सांभाळला असून केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकला देशात अकराव्या स्थानी नेण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. तसेच नाशिकचे अपर जिल्हाधिकारी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तसेच नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Next Post

पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन

Next Post
IMG 20200902 WA0200

पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011