पाटणा – बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रीया सध्या सुरू आहे. मात्र, ही प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत सुरू राहू शकते. तशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच आर श्रीनिवास यांनी दिली आहे. या निवडणुकीत तब्बल ४ कोटी १० लाख एवढे मतदान झाले आहे. मतमोजणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूम ९२ लाख मतांची मोजणीच पूर्ण होऊ शकली आहे. यापूर्वी मतमोजणीच्या २५ ते २६ फेऱ्या होत होत्या. मात्र, यंदा याच फेऱ्या तब्बल ३५ आहेत. त्यामुळे मतमोजणीला उशीर होणार असल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले आहे. म्हणजे, मतमोजणी उशीरा सुरू राहिल्यास निकालही उशीराने लागणार आहेत.