मुंबई ः पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात असताना मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्यावरही दबाव वाढला आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ट्विट करून राजमधर्माची आठवण करून दिली आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
संजय राऊत यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, `छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो ? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन ! ` पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राजीनामा घेण्याचा दबाव वाढत आहे.