राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन, माजी महापौरांना मास्क काढण्याचा केला इशारा
नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी ते विनामास्क सर्वांच्या भेटी घेत होते. यावेळी त्यांनी माजी महापौर अशोक मुर्तडक यांना मास्क काढण्याचा इशारा दिला. मोठ्या अंतराने त्यांचे त्यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुक वर्षभरावर येऊन ठेपली असून त्यादृष्टीने यावेळी राज ठाकरे हे बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. नाशिकमध्ये भाजप व मनसे युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुध्दा नाशिकमध्ये विविध कार्यक्रमा निमित्त येणार आहे. त्यामुळे ठाकरे – फडणवीस भेटीची शक्यता सुध्दा वर्तवली जात आहे.
राज ठाकरे यांनी याअगोदरच मी मास्क घालणार नाही, असे सांगितले होते. नाशिकमध्ये आता त्यांनी कार्यकर्त्यांनाही सांगितले. विना मास्क बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत बोलताना मास्क न घालणाऱ्या राज ठाकरें यांच्यावर चिमटे काढले होते. काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही असे सांगतात. अरे बाबा तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसर्याला होईल त्याचं काय ? दरेकर असे कसे तुमचे जुने नेते ?” असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी टीका केली होती.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!