रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यामध्ये आता ड्रोनद्वारे वृक्षारोपण; यंदा ४ कोटी वृक्ष लागवड

मार्च 22, 2021 | 4:08 pm
in राज्य
0
Hon cm sir forest meeting 1 1140x616 1

मुंबई – पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणीने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यावर वन विभागाने भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील समिती कक्षात यंदाच्या पावसाळी वृक्ष लागवड नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला. एकंदर ४ कोटी रोपे लावण्यात येणार आहेत असे वन विभागाने सांगितले.
सर्वसामान्य जनतेला आपली वाटावी अशी योजना व्हावी
          वृक्ष लागवड करताना पर्यावरण प्रेमी, जंगल प्रेमी तसेच स्वयंसेवी संस्था, युवक यांचा सहभाग घ्यावा .यासाठी त्यांना आवाहन करण्यात यावे . वृक्ष लागवडीसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे.  जनतेला आपली वाटेल अशी ही वृक्षलागवड योजना झाली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी  व्यक्त केली.
भौगोलिक प्रदेश व हवामानानुसार वृक्ष लागवड व्हावी
        प्रत्येक भौगोलिक प्रदेशानुसार पावसाळी परिस्थिती व हवामानाची स्थिती,जमीन याचा अंदाज घेवून व जी  झाडे उपयुक्त आहेत त्याप्रमाणे वृक्षारोपण करण्यात यावे.वृक्षारोपण करतांना खरे उद्दिष्ट ठरवून खरेखुरे उद्दिष्ट गाठावे.वृक्षलागवडीचा कालबद्ध कार्यक्रम आखावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
पर्यटकांना आकर्षित करणारी शोभिवंत झाडे  लावावी
             वृक्ष लागवड करताना पर्यटनाचाही विचार व्हावा. शहरी भागात रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांना आकर्षित करणारी शोभिवंत झाडे लावावी. तसेच जपानमध्ये ज्याप्रमाणे माऊंट येशीनो येथे नैसर्गिकरित्या दरी फुलून जाते. त्याप्रमाणे राज्यात डोंगर उतारावर काय करता येईल याचाही विचार वनविभागाने करावा. झाडांच्या देशी प्रजाती लावण्यावर भर देण्यात यावा जेणे करून पक्ष्यांना देखील खाद्य व आश्रय मिळेल.  जव्हार ,कोल्हापूर ,सावंतवाडी, वनविभाग, मेळघाट व अमरावती वनविभाग व नांदेड वन विभागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणी करताना नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळचाही त्यामध्ये समावेश करावा असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
नियोजनबद्ध वृक्ष लागवड व्हावी
        वृक्ष लागवड करताना अधिक नियंत्रित पद्धतीने व नियोजनबद्धरित्या करण्यात यावी. यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
            यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर,  मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वन विभागाचे सहसचिव अरविंद आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)  साईप्रकाश,प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्वश्री प्रवीण श्रीवास्तव,प्रदीप कुमार , एन. के. राव आदि अधिकारी नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
अशी असते हवाई  बीज पेरणी
– कमी वेळात जास्त दुर्गम क्षेत्रात व मोठया क्षेत्रावर वृक्षाच्छादन करण्यासाठी हवाई बीज पेरणी हे एक महत्वाचे माध्यम आहे.
त्याचे २ प्रकार आहेत.
१. बीज गोळा पेरणी (Seed ball)
२. रोप लागवड (रोपवाटिकेमधील तयार रोपे)
– या पावसाळयात काही निश्चित क्षेत्रावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बीज गोळे (seed ball) पेरणी करुन त्या क्षेत्रावर तयार होणा-या रोपवनाचे परिणाम निरिक्षण करण्यात येईल.
– ड्रोनचा वापर करून बीज गोळा पेरणी करण्यात येऊन त्याची तपासणी करता येईल.
– स्थानिक जंगलातील प्रजातींचे जमा केलेले बीज, माती व शेणखत याचे मिश्रण याद्वारे बीज गोळे तयार करुन व त्यांना सुकवून त्यांचा वापर करण्यात येईल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरासह जिल्ह्यात कंटेनमेंट झोनमध्ये आता पोलिसाची नियुक्ती

Next Post

पिंपळगाव बसवंतला कांद्याचे दर गडगडले, लाल ४२२, उन्हाळ कांदा ४४९ रुपयांनी घसरला

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
02 18 201912333128

पिंपळगाव बसवंतला कांद्याचे दर गडगडले, लाल ४२२, उन्हाळ कांदा ४४९ रुपयांनी घसरला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011