राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१. १४ टक्के – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई – राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवारी (१८ ऑगस्ट) ११ हजार ११९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.