मुंबई – राज्यात आतापर्यंत ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के आहे. सध्या २ लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १३ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले तर १५ हजार ५९१ नवीन रुग्णांची नोंद झाली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६९ लाख ६० हजार २०३ नमुन्यांपैकी १४ लाख १६ हजार ५१३ नमुने पॉझिटिव्ह ( २०.३५ टक्के) आले आहेत. राज्यात २१ लाख ९४ हजार ३४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
एकूण: बाधित रुग्ण-(१४,१६,५१३) बरे झालेले रुग्ण-(११,१७,७२०),मृत्यू- (३७,४८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४३७),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,६०,८७६)