रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यात कोरोना उपचारासाठी उपलब्ध होणार एवढे डॉक्टर

by India Darpan
सप्टेंबर 17, 2020 | 11:00 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200716 WA0021

मुंबई – वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत कोविड रुग्णांची निकड लक्षात घेऊन संस्थानिहाय आणि विषयनिहाय बंधपत्रित उमेदवारांना सेवेसाठी नियुक्ती  देण्यात येणार आहे. सध्या १ हजार २०४ बंधपत्रित उमेदवार यामुळे उपलब्ध होणार आहेत. काही विषयांमधील उमेदवार अधिक असून विषयनिहाय जागा कमी उपलब्ध आहेत अशा उमेदवारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या वरिष्ठ निवासी किंवा वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती देऊन त्यांच्या सेवा उपयोगात आणल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील कोविड १९ रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन अतिविशेषोपचार व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बंधपत्रित सेवेसाठी नियुक्ती देण्यात येणार आहे. सध्या राज्यातील कोविडची  परिस्थिती पाहता, या विद्यार्थ्यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या मागणीनुसार किंवा जिल्ह्यातील कोविड संख्या लक्षात घेऊन बंधपत्रित सेवेकरिता नियुक्ती देण्‍यात येणार आहे.

सध्या राज्यातील कोविड रुग्ण वाढत असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णांची संख्या व तेथील रुग्णोपचाराची परिस्थिती विचारात घेऊन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्समध्ये अतिरिक्त आणि विशषज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेस १ हजार ६४८ विद्यार्थी बसले होते. उन्हाळी २०२० सत्राच्या परीक्षा नुकत्याच झाल्या असून परीक्षेचा निकाल लवकरच अपेक्षित आहे.

विद्यापीठाने या परीक्षांचा निकाल घोषित केल्यावर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर किंवा अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बंधपत्रित सेवा देण्यात येते.

पदव्युत्तर तसेच अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाच्या परीक्षेस १ हजार ६४८ विद्यार्थी बसले आहेत. तर विभाग निहाय उपलब्ध होणाऱ्या बंधपत्रित विद्यार्थ्यांची संख्या १ हजार २०४ असणार आहे. तर वरिष्ठ निवासी तसेच वैद्यकीय अधिकारी पदावर बंधपत्रित विद्यार्थ्यांची संख्या ४४४ असणार आहे. बंधपत्रित विद्यार्थ्यांना द्यावयाच्या नियुक्तीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मात्र कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहून या कार्यपद्धतीतून ३१ मार्च २०२१ पर्यंत सूट देण्यात यावी असे १४ सप्टेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांना कळविण्यात आले आहे.

शासकीय/महापालिका वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालये, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये येथील मागणी आणि त्यानुषंगाने उपलब्धतेनसुार बंधपत्रित विद्यार्थ्यांच्या सेवा देण्यात येणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून ३८५, बृहन्मुंबई महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून १७८, महापालिका रुग्णांलयातील विशेषज्ञ अधिकारी म्हणून २८२, तर आरोग्य सेवा अंतर्गत रुग्णालये/ डीसीएच/डीसीएचसी येथे ३५९ असे एकूण १ हजार २०४ बंधपत्रित उमेदवारांच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय वरिष्ठ निवासी पदासाठी ४४४ विशेषज्ञ यांची सेवा उपलब्ध होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी नमूद केले.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – माथाडी कामगारांना मंडळाकडून दोन हजार रुपयांची मदत

Next Post

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लँट; पालकमंत्र्यांचे निर्देश

Next Post
civil hospital 1 e1652770306112

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लँट; पालकमंत्र्यांचे निर्देश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011