मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने नवी नियमावली जाहिर केली आहे. राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरू आहे की काय, अशी स्थिती आहे. त्यामुळेच सरकारने अनेक प्रकारचे निर्बंध लागू केले आहेत.
नव्या नियमावलीनुसार
-
कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती
-
थिएटर आणि मॉलमध्ये निम्मीच उपस्थिती
-
सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी
-
अंत्यसंस्कारावेळी केवळ २० जणांनाच परवानगी
-
विवाह सोहळ्यांसाठी केवळ ५० जणांना मान्यता
-
धार्मिक स्थळे आणि ट्रस्ट यांनी दर तासाला गर्दीचे व भाविकांचे नियोजन करावे. कसोशीने कोरोना नियमांचे पालन करावे