मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. खासकरुन काही शहरांमध्ये कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. त्यामुळे तेथील बाधितांचीय संख्या झपाट्याने वाढत आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. येत्या दोन दिवसात राज्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. जिथे गरज आहे तिथे लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस आज घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे की काय, अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसात दहा हजारा पेक्षा अधिक बाधित एका दिवसात झाले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
मी लस घेतली आहे. ती अतिशय सुरक्षित आहे. आपणही घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1369929269976080386