नाशिक – राज्यातील ९६ पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीने बदल्या करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. त्यात नाशिकच्या तीन निरीक्षकांचा समावेश असून के.डी. पाटील यांची नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपअधिक्षक पदी तर टीआरटीआयचे नवलनाथ तांबे यांची नाशिक शहर पोलीस दलात सहाय्यक आयुक्तपदी वर्णी लागली आहे.
सन. २०१७ – १८,२०१८ – १९ व २०१९ -२०२० या निवडसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या राज्यातील ९९ निशस्त्र पोलीस निरीक्षक या संवर्गातील अधिका-यांना गृहविभागाने उप अधिक्षक – सहाय्यक आयुक्त या पदावर पदोन्नती देवून बदल्या केल्या. या पदोन्नती बदलीच्या प्रक्रियेत शहर पोलिस दलातील डीटीएसमध्ये कार्यरत असलेल्या रामदास पाटील यांची नंदूरबार येथे उपअधिक्षक पदावर बदली झाली. टीआरटीआय येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या नवलनाथ तांबे यांची नाशिक शहर पोलिस दलात बदली झाली आहे. दरम्यान, शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक के. डी. पाटील यांची पदोन्नतीने नाशिक जिल्हा जात पडताळणी विभागात बदली करण्यात आली. मुंबई पोलिस दलातील जार्ज पिटर फर्नांडीस यांची डीटीएसमध्ये, सोलापूर ग्रामीणमधील प्रदीप जाधव यांची पोलिस उपअधिक्षक म्हणून मालेगाव कँम्प येथे बदली झाली आहे. तर, मुंबई पोलिस दलातील किशोर सावंत यांची नागरी हक्क संरक्षण,नितीनकुमार पोंदकुले यांची टीआरटीआय येथे आणि नंदूरबार पोलिस दलातील बाळासाहेब गायधनी यांना महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे नियुक्ती देण्यात आली आहे.