मुंबई – राज्यात इयत्ता ९वी ते १२वीचे वर्ग सुरू केल्यानंतर आता इयत्ता ५वी ते ८वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाच्या कारणांमुळे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता ५वी ते ८वीचे वर्ग सुरू केले जाणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहिर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर सर्व प्रकारचे कोरोना नियम पाळणे सक्तीचे केले जाणार आहे. त्यामुळे आता ५वी ते १२वी पर्यंतच्या शाळा गजबजणार आहेत.