नाशिक – राज्यातील निशस्त्र पोलीस उपअधिक्षक – सहाय्यक आयुक्त संवर्गातील बारा अधिकाऱ्यांच्या गृह विभागाने बदल्या केल्या आहेत. त्यातील दोन अधिकारी नाशिक जिह्यास लाभले असून, मालेगाव शहरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी मुंबईच्या सहाय्यक आयुक्त लता दोंदे यांची वर्णी लागली आहे.
राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपअधिक्षक – सहाय्यक आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील बारा अधिकाऱ्यांच्या बुधवारी (दि.६) गृह विभागाने बदल्या केल्या. ठाणे येथील नागरी हक्क संरक्षण दलाचे उपअधिक्षक शांताराम वळवी यांची बदली नाशिक महामार्ग सुरक्षा पोलीस उपअधिक्षकपदी करण्यात आली तर मुंबई शहरच्या सहाय्यक आयुक्त लता दोंदे यांची मालेगाव शहरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर वर्णी लागली आहे. मालेगाव येथील उपविभागीय अधिकारी पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त होते.