मुंबई – राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार यांची पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी अधिक जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन, असेही श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.