मुंबई – राज्य सरकारने सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी (१० ऑगस्ट) काढले आहेत. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्याकडे महसूल व वन विभागाच्या प्रधान सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा सचिव संजय खंदारे यांची महाजेनकोचे व्यवस्थापकीय संचालक म्हमून बदली करण्यात आली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना मंत्रालयत मुख्य सचिवांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून बोलविण्यात आले आहे. नवी मुंबईतील जलस्वराज्य प्रकल्पाचे व्यवस्थापक ए ए गुल्हाणे यांना चंद्रपूर जिल्हाधिकारी पदाची जबाबजारी देण्यात आली आहे. अतिरीक्त जिल्हाधिकारी के एच बगाटे यांची शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त पदाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य संचालक अश्विनी जोशी यांना पदमुक्त करण्यात आले असून त्यांना सध्या नवी नियुक्ती देण्यात आलेली नाही. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना डेप्युटेशनवर पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाली आहे.