मुंबई – ७ व ८ एप्रिल २०२१ असे दोन दिवस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल व मुख्य सचिव यांची भेट घेऊन अथवा फोनद्वारे राज्यातील व्यापाऱ्यांची भूमिका समजावून ब्रेक द चेनचा निर्णयात बदल करण्यास सांगणे व ८ एप्रिल २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास ९ एप्रिल २०२१ रोजी राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सुरु करतील. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असा ठराव राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चर तर्फे आज ६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता “ब्रेक द चेन व व्यापार बंद” या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासद यांची झूम ॲपवर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली.
सुरवातीला चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सर्वांचे स्वागत करून महाराष्ट्र सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी ब्रेक द चेनचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे आजची बैठक बोलवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अतिशय कमी वेळेत मिळालेल्या सूचनेवर सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद दिले.
बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, विश्वस्त आशिष पेडणेकर, श्री. विलास शिरोरे, उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष श्री. अनिलकुमार लोढा, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री. विनोद कलंत्री, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री. संजय शेटे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, चेंबर ऑफ मराठवाडा, इंडस्ट्रीज अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री. कमलेश धूत , पूना मर्चन्टस चेंबर्सचे अध्यक्ष श्री. पोपटलाल ओस्तवाल, चेंबर ऑफ असोसिएशनस ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँण्ड ट्रेडचे अध्यक्ष दीपेंन अग्रवाल, कॅटचे राज्य चेअरमन राजेंद्र बांठिया, चंद्रपूर चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन संघवी, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. अश्विन मेदांडिया, गोंदिया जिल्हा व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्री. रामजीवन परमार, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, हार्डवेअर अँन्ड पेन्ट्स मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार लोढा, येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. योगेश सोनावणे, श्री. मोहन गुरुनानी, नाशिक मोटार मर्चन्ट असोसिएशनचे श्री. सुरेश चावला, बिमाचे विक्रम दोशी, टिम्बर फेडरेशन, स्टील चेंबर, सिमेंट स्टोकिस्ट असोसिएशन, तुर्भे व्यापारी असोसिएशन, पालघर वसई तारापूर असोसिएशन, कॅटचे श्री दिलीप कुंभोजकर, अंबरनाथ असोसिएशनच्या पदाधिकारीसह व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी सरकारच्या ब्रेक द चेन विषयावर आपली मते मांडली.
शेवटी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी आभार मानले. बैठकीस कॅटचे उपाध्यक्ष मेहुल थोरात, महाराष्ट्र चेंबर प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे, सचिव विनी दत्ता आदीसह १७० व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.