मुंबई – राज्य सरकारने बर्ड फ्लुच्या प्रादुर्भावाची दखल घेत पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत बदल केला आहे. पशुपालकांच्यादृष्टीने पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळा ह्या गैरसोयीच्या होत असल्याने गुरुवार (७ जानेवारी) पासून राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा बदलल्या आहेत.
श्रेणी-१ श्रेणी-२, तालुका, लघु आणि पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, तसेच फिरते पशुवैद्यकीय दवाखाने दोन सत्राऐवजी सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यात जेवणाची सुट्टी दुपारी १ ते १.३० या वेळेत असेल. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत दवाखाने सुरू राहतील. आकस्मिक प्रसंगी २४ तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. पशुपालकांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिकी पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.