मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात आज अर्थसंकल्प सादर केला. त्यात नाशिकसाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या अशा
-
नाशिक-मुंबई महामार्गाची कनेक्टिव्हिटी आणखी सुलभ होणार
-
नाशिक-पुणे महामार्गासाठी तरतूद
-
भविष्यातील गरजा लक्षात घेता इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले मेगा चार्जिंग स्टेशन नाशिकला होणार
-
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा असलेला नागपूर ते शिर्डी हा येत्या १ मे रोजी सुरू होणार
-
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने केले जाणार. एकूण २३५ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून त्यासाठी १६ हजार ०३९ कोटींची तरतूद
-
नाशिक निओ मेट्रो करिता राज्य सरकारच्या वाट्याला असलेला आलेला निधी देणार
-
नाशिकमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय साकारणार