मुंबई – राज्यात आज ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले तर १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रविवारी (३० ऑगस्ट) दिवसभरात १६ हजार ४०८ नवीन रुग्ण तर २९६ मृत्यूंची राज्यामध्ये नोंद झाली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख ८४ हजार ७५४ नमुन्यांपैकी ७ लाख ८० हजार ६८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.