मुंबई – राज्यात आज ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार १६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६४ हजार ५६२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.