मुंबई – राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या वतीने १२ आणि १३ डिसेंबरला राज्यस्तरीय महारोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. यातून उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. उमेदवारांसाठी ७० हजार रिक्त पदे उपलब्ध आहेत. दरम्यान, ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांना आताही नोंदणी करता येणार आहे.
राज्यातले उद्योग, व्यवसाय पूर्ववत कार्यरत होत आहेत, त्यामुळे रोजगाराच्या या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नोकरीसाठी इच्छुक युवक युवतींनी
www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात उच्चशिक्षित उमेदवारांपासून ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असून डॉक्टर, नर्स, रुमबॉय, एचआर, मॅनेजर, गार्ड पर्यंत तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त टर्नर, फिटर, प्लंबर, मशिनिस्ट, मोटार मॅकनिक, डिझेल मॅकेनिक, सीएनसी ऑपरेटर, ब्रायलर अटेंडंट, कुशल व अकुशल कामगार, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी, कृषी पदवीधर, व्यवस्थापनातील पदवी, लेखापाल इत्यादी विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
उच्चशिक्षित उमेदवारांपासून ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या हमखास संधी प्राप्त होणार असून डॉक्टर, नर्स, रुमबॉय, एचआर, मॅनेजर, गार्डपर्यंत तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त टर्नर, फिटर, प्लंबर, मशिनिस्ट, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, सीएनसी ऑपरेटर, ब्रायलर अटेंडंट, कुशल व अकुशल कामगार, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी, कृषी पदवीधर, व्यवस्थापनातील पदवी, लेखापाल इत्यादी विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. कोरोनाच्या संकटाने अर्थचक्र काही प्रमाणात संथ झाले होते. रोजगाराच्या संधीद्वारे अर्थचक्र गतिमान करण्यासाठी शासनाचा हा राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचा उपक्रम आहे.