शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यस्तरीय बाबाज् करंडक स्पर्धेत टिटवाळ्याची ‘ स्टार ‘ एकांकिका सर्वप्रथम

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 14, 2021 | 3:01 pm
in इतर
0

नाशिक – बाबाज् थिएटर्स आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकांकिका स्पर्धेचे यंदा २१ वे वर्ष आहे. अतिशय उत्साहात चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत टिटवाळा येथील जिराफ थिएटर्सच्या ‘ स्टार ‘ या एकांकिकेला २० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व करंडक देण्यात आला. द्वितीय १५ हजारांचे पारितोषिक कोल्हापूरच्या परिवर्तन कला फाउंडेशन निर्मित ‘ जंगल जंगल बटा चला है ‘ या तर तृतीय १० हजार रुपयांचे पारितोषिक डोंबिवलीच्या स्वामी नाट्यांंशन निर्मित ‘ नवरा आला वेशीपाशी ‘ या एकांकिकांंना  देण्यात आले. यावेळी एकूण ८५ हजार रुपयांची रोख पारितोषिके प्रमुख पाहुणे व ९४ व्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर व लोकनेते सुनील बागूल, उपमहापौर भिकुबाई बागूल यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
    परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या पारितोषिक वितरण समारंभात व्यासपीठावर युवानेते मनीष बागूल, प्रीतम बागूल, धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर बागूल व मान्यवर उपस्थित होते. बाबाज् थिएटर्सचे संस्थापक, अध्यक्ष प्रशांत जुन्नरे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. ते म्हणाले, यापुढे दरवर्षी दि.७ ते १३ फेब्रुवारी दरम्यान लोकोत्सव सांस्कृतिक सोहळा आयोजित केला जाईल. यंदा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेसाठी एकूण ७३ प्रवेशिका दाखल झाल्या. मात्र अडीच दिवसांच्या मर्यादेत त्यातील ३४ एकांकिका सादर करण्याची संधी देण्यात आली.पुढील वर्षापासून बाबाज् करंडक स्पर्धा ५ दिवस घेण्यात येईल. त्यामुळे जास्त स्पर्धकांना सहभागी होता येईल असे त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले. उत्तर महाराष्ट्रात समग्र गुरुकुल व कलाअकादमी लवकरच स्थापन करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. जयप्रकाश जातेगावकर म्हणाले, कोरोनामुळे सांस्कृतिक व नाट्यक्षेत्रावर आलेली मरगळ लोकोत्सवाने दूर केली आहे. पुढील वर्षी सार्वजनिक वाचनालयातर्फे जुन्नरे व त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असेही त्यांनी नमूद केले. सुनील बागूल यांनी गुरुकुल व कलाअकादमी प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली.
  स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी  प्रमोद तेंब्रे, संध्या धोपावकर, अंशू सिंग यांनी पार पाडली. परीक्षकांचे विशेष पारितोषिक नाशिकच्या रुद्राक्षम थिएटर निर्मित ‘ फिल्मसिटी ‘ एकांकिकेने पटकावले. वैयक्तिक स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष – प्रथम – वैभव ओगले (आकांत), द्वितीय – केदार देसाई ( तुकडबग्गा ), तृतीय – अनिल आव्हाड ( स्टार) उत्तेजनार्थ – स्वप्नील दळवी ( नवरा आला…), प्रणव सपकाळे (कलंडलेले पेले ), सूरज बोढाई (नॉट…) सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री – प्रथम – अनामिका डांगरे, द्वितीय -अक्षता शब्दे ( स्टार), तृतीय -मिथिला पाटील ( नवरा आला…), उत्तेजनार्थ – करिष्मा वाघ ( द डे),गायत्री नाईक ( घरोट), अलका बोटे ( टेक ऑफ) , वाचिक अभिनय – आकाशरेखा थिटे ( मिठी मारतांना ), मानसी वाकडे (रात्रीस खेळ चाले ), दिग्दर्शन – प्रथम – करणसिंह चव्हाण ( जंगल…), बॉबी ( स्टार ) तृतीय – यश नवले ( नवरा आला…) विनोदी अभिनेता – बळीराम शिंदे  (भोकरवाडीचा शड्डू) नेपथ्य – प्रथम हेमंत वनगे/ अमोल जाधव ( घरोट ), द्वितीय – आकाश पांडे / मनीषा प्रजापती, तृतीय – प्रदीप भोई ( भ भुत्या ) प्रकाशयोजना – प्रथम अनुप बहाळ ( उत्खनन ) साई शिर्सेकर ( स्टार ) पार्श्वसंगीत – रोहित सरोदे ( फिल्मसिटी ), द्वितीय – ऐश्वर्या बारवाल ( स्टार), तृतीय – ओंकार वरणे ( जंगल..) यांना रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रवीण कांबळे व सहकाऱ्यांनी एकांकिका स्पर्धेचे संपूर्णपणे नियोजन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद जोशी यांनी केले.
१३ पर्यंत चाललेल्या या लोकोत्सव सोहळ्यात कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्यात आले.  मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाशिककर रसिकांनी सर्व मैफली व एकांकिकांचा विनामूल्य  आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर बागूल,राजेश पिंगळे, नारायण गायकवाड, सचिन दप्तरी, विजय निकम, किसन बल्लाळ, अमोल पाळेकर, प्रा. प्रीतिश कुलकर्णी, एन. सी. देशपांडे, जगदीश जंगम, विजयराजे भोसले, विकास बल्लाळ, कैलास पाटील आदी कार्यकर्ते प्रयत्नशील होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कवी प्रा.गणेश शिंदे यांच्या प्रवासादरम्यान कवितेने केली धूम….( बघा VDO)

Next Post

विद्रोही साहित्य संमेलन २५, २६ मार्चला, स्वागताध्यक्षपदी शशी उन्हवणे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
प्रातिनिधिक फोटो
आत्महत्या

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची मांजरा नदीत उडी…छगन भुजबळ घेणार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सप्टेंबर 12, 2025
doctor
राष्ट्रीय

या संतनगरीत होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

सप्टेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Next Post
IMG 20210214 WA0020

विद्रोही साहित्य संमेलन २५, २६ मार्चला, स्वागताध्यक्षपदी शशी उन्हवणे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011