पुणे – १४ मार्च रोजी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुण्यात परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत नवी पेठे येथे रास्ता रोको केला. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी संतापले आहे. या आंदोलकांनी नवी पेठेतील दोन्ही रस्ते रोखून धरल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड सुरु केली.
या परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी संतापले आहे. विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील दोन्ही रस्ते रोखून धरले होते. पोलिसांकडूनही विद्यार्थ्यांची धरपकड सुरु आहे. परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असतांना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या सुरु केला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी परीक्षार्थींची धरपकड सुरु केली. ही परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून दिली आहे. राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याववर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असे आयोगाने म्हटले आहे. याआधी ही परीक्षा एप्रिल, सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती. पण, तेव्हाही कोरोना व लॅाकडाउनमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आता ती पुन्हा पुढे ढकलण्यात आल्यामुळे हा संताप व्यक्त केला जात आहे.