नवी दिल्ली – काँग्रेसनं राज्यसभेत आपले नवीन विरोधी पक्षनेते निवडले आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १५ फेब्रुवारीला सध्याचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद निवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड केली आहे. नव्या विरोधी पक्षनेत्याबाबत काँग्रेसनं राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे.
गुलाम नबी आझाद यांचा १५ फेब्रुवारीला कार्यकाल समाप्त होणार असून, त्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त होणार आहे. गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरमधून राज्यसभेवर आले होते. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा असलेले ३७० अनुच्छेद काढल्यानंतर जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाले आहे. त्यानंतर तिथं कोणतीही विधानसभेची जागा राहिली नाही.
कर्नाटकमधले दलित नेते मल्लिकार्जुन खरगे २०१४ ते २०१९ पर्यंत लोकसभेत काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते होते. कमी खासदार निवडून आल्यानं काँग्रेसला आजी-माजी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळून शकले नाही. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एकूण जागांपैकी कमीत कमी १० टक्के जागा निवडून अनिवार्य आहे.
काम करणं कठीण
राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांना भावूक निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणाले की, गुलाम नबी आझाद यांच्यानंतर जो कोणी विरोधी पक्षनेतेपदाचं स्थान स्वीकारेल त्याला आपलं काम करणं कठीण जाईल. कारण ते केवळ पक्षाच्या बाबतीतच नव्हे तर देश आणि सभागृहाबाबत चिंतीत होते.