पाटणा – विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. कारण सत्ताधारी पक्षाला सलग तिसऱ्यांदा आव्हान देण्याची तयारी विरोधी पक्ष करीत आहेत. विधानसभा आणि सभापतींच्या निवडणुकांनंतर आता राज्यसभा निवडणुकीत देखील एनडीएविरोधात महायुती उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. राज्यसभेच्या जागेसाठी सुशील मोदी आणि रिना पासवान आमने सामने येण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला आता एक मजबूत आणि प्रभावी उमेदवाराची प्रतीक्षा आहे. कारण माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे या जागेवर आता निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३ डिसेंबरपर्यंत आहे. रिना यांना महायुतीच्या वतीने उमेदवारी देण्याबाबच राबड़ी देवी आणि तेजस्वी यादव यांची सहमती आहे.
एकीकडे भाजपने सुशील मोदी यांना उमेदवारी दिल्यानंतर आरजेडी पक्ष आता कोंडीत सापडला आहे. कारण अल्पसंख्याक उमेदवार असता तर आरजेडीने आपल्या व्होट बँकची काळजी घेतली असती आणि आव्हान देण्याचे टाळले असते. त्यामुळे दुसरीकडे लोक जनशक्ती पार्टीला (एलजेपी) निवडणूकीत उमेदवार उभा करण्याकरिता मनधरणी केली जात आहे. त्यामुळे चिराग पासवान यांना पुढे करून त्यांची आई रीना पासवान यांना महायुतीच्या एकमताने उमेदवार म्हणून भाजपा समोर मोठे आव्हान निर्माण केले जात आहे.
त्याचप्रमाणे, इतर पर्यायांवरही विचार केला जात आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीत सत्तेच्या अगदी जवळ जवळ पोहोचलेल्या विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना आता मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारला राज्यसभा निवडणुकीत अजिबात संधी द्यायची इच्छा नाही. तेजस्वी यादव हे चिराग यांच्या होकाराची वाट पहात आहेत. चिरागचे वडील रामविलास पासवान यांच्या निधनामुळे या रिक्त जागेवर आता निवडणूक होत आहे.