माझी कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. आवश्यक वाटत असेल तर स्वतःची चाचणी करून घ्यावी, असं कडू यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघातले आमदार बच्चू कडू यांना यापूर्वीही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दुसर्यांदा ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) February 19, 2021