मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची पत्नी स्वप्नाली यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटिस बजावल्यानंतर आज दुपारी त्या ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यांची चौकशी सुरू आहे.
काँग्रेस नेते डॉ. कदम यांच्या पत्नी स्वप्नाली या पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कन्या तर दिवंगत काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या स्नुषा आहेत. गेल्या आठवड्यात ईडीने भोसले यांच्या मुंबई, पुण्यासह विविध शहरातील कार्यालयांवर छापा मारला होता.
