कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७ टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात आज ७२२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख ७ हजार १९४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९२५१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० नमुन्यांपैकी ३ लाख ६६ हजार ३६८ नमुने पॉझिटिव्ह (१९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९४ हजार ५०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ६०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६५ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २५७ मृत्यू हे मुंबई मनपा-५२, ठाणे-३, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-९,कल्याण-डोंबिवली मनपा-१२, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-९, मीरा-भाईंदर मनपा-२, वसई-विरार मनपा-७, पालघर-२, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-८, धुळे- १, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-४, नंदूरबार-१, पुणे-१७, पुणे मनपा-४५, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर-८, सोलापूर मनपा-४,सातारा-१, कोल्हापूर-७, सांगली-२, सांगली मिरज कुपवाड मनपा-१, सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-५, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, बीड-१, नांदेड-३, नांदेड-१, नांदेड मनपा-१, अकोला-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-१,नागपूर मनपा-१, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.