मुंबई – राज्यात आज ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.