मुंबई – राज्यपाल भगसतिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रापत्री चांगलीच गाजली आहे. मंदिरे बंद असल्याच्या कारणावरुन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हेच का तुमचे हिंदुत्व असा खोचक प्रश्न विचारला आहे तर मुंबईला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत स्वागत करणारे माझे हिंदुत्व नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. त्यामुळे राज्यभरात ही बाब विशेष चर्चेची ठरली आहे.
बघा कोण काय म्हणतंय ?
एकीकडे तुम्ही बार, रेस्टॉरंट सुरू केले. त्याच वेळी दुसरीकडे आपल्या देवी-देवतांना कुलूपबंद करून ठेवले आहे. धार्मिक स्थळे सुरू करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर कोरोनाचा प्रसार झाल्याचे आढळून आलेले नाही.
- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
—
आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र, माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
राज्यपालांचे 100 टक्के बरोबर .त्यांचे कडे मन्दिराबत अनेक निवेदनं येत असल्याने ते सुचवतील तर कुठे बिघडले .मंदिरावर अवलंबुन असणारे लाखो कुटुंबे आज बेरोजगार आहेत . एकवेळा दारू दुकानें बंद असली तरी चालतील कुणी जास्त बेरोजगार होणार नाही .पण मंदिर उघडणे गरजेचं वाटतं . वैयक्तिक मत आहे .