नवी दिल्ली – राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनात सध्या तिसरी लाट सुरू असून प्रदूषणामुळे कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या १५ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमाण अधिक आहे. दिल्लीत एक हजारपेक्षा जास्त प्रतिबंधित क्षेत्र तयार झाले आहेत. दिल्लीत कोरोनाच्या बाधितांची संख्या ४ लाख ८५ हजार एवढी झाली आहे तर आतापर्यंतच्या मृतांची संख्या ७ हजार ६१४ एवढी झाली आहे.
दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर पर्यंत शहरात ३३५९ प्रतिबंधित क्षेत्र होते. मात्र आत त्यात वाढ झाली असून प्रतिबंधित क्षेत्राचा आकडा ४४३० वर पोहोचला आहे. यात सर्वात जास्त म्हणजे ७४० प्रतिबंधित क्षेत्र दक्षिण दिल्लीत असून सर्वात कमी १४२ उत्तर पूर्व दिल्लीत आहेत. ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झक्याचे समोर आले आहे. बुधवार पर्यंत नव्या ८००० रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात १०४ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. दिल्ली सरकारच्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर पर्यंत ५०० हुन अधिक प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यात दक्षिण पश्चिम ( ७४० ), दक्षिण ( ७०० ), पश्चिम ( ५६८ ) आणि दक्षिण पूर्व भागात ( ५०५ ) प्रतिबंधित क्षेत्र आहेत.