मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केला. महापौरांनी कोविड सेंटरचे कंत्राट ज्या कंपनीला दिले आहे ती त्यांचे पुत्र साईप्रसाद पेडणेकर यांची असल्याचे मनसेने म्हटले आहे. तर, हे आरोप खोटे असून तसे मनसेने सिद्ध करावे, असा आव्हान पेडणेकर यांनी दिले आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. कोविड सेंटरचे काम दिलेल्या कंपनीचे सह संचालक म्हणून साईप्रसाद पेडणेकर यांचे नाव असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. मात्र, महापौरांनी हा दावा खोडून काढला आहे. मनपाच्या कामात पारदर्शकता असून मनसेने खोटे आरोप करणे बंद करावे, असे महापौरांनी म्हटले आहे.