नवी दिल्ली : चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली आणि नृत्य संस्था उघडण्याच्या नावाखाली राखी सावंतचा भाऊ राकेश याने शैलेश श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीकडून सहा लाख रुपये घेतले. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत आणि तिच्या भावाविरूद्ध विकासपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
चित्रपट अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात सापडलेली असते. अनेकदा ती वादग्रस्त वक्तव्य देखील करते, सध्या मात्र ती आपल्या भावामुळे एका वादात अडकली आहे. राखी सावंत हिचा भाऊ राकेश याने शैलेश श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीकडून चित्रपटाच्या शूटिंग करायचे असून त्यात तुमचा देखील सहभाग असेल असे सांगून तसेच नृत्य संस्था उघडण्याच्या नावाखाली सहा लाख रुपये घेतले.
या संस्थेचे उद्घाटन राखी सांवत करणार होती, सर्व काही ठरल्यानंतरही ना कोणताही चित्रपट बनला आहे ना नाचण्याची कोणतीही संस्था उघडली गेली आहे. मात्र दोघा भावा – बहिणीने फसवणूक केली, असेही तक्रारीत म्हटले आहे, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासादरम्यान कोणाविरुद्ध काही पुरावे आले तर कारवाई केली जाईल. असेही पोलीसांनी सांगितले .