नाशिक – प्रभागातील रस्त्याचे कामे मार्गी लागत नसल्याने सातपुर प्रभाग सभापती संतोष गायकवाड यांनी थेट खड्यात बसून ऑनलाइन महासभेत सहभाग घेतला. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे महासभेतही चर्चा रंगली. गायकवाड यांनी केलेल्या या आंदोलनात त्यांनी डीजीटल बॅनरचा वापर केला. त्यात दत्तक नाशिकचा गाजावाजा झाला, महापौर साहेब, आपण तरी लक्ष घाला, नाशिक झाले त्रस्त, प्रशासन मात्र मस्त, अशा फलकाचाही वापर केला.