नवी दिल्ली – नोबेल पुरस्कार समितीने रसायनशास्त्रातील नोबेलसाठी दोन महिलांची निवड केली आहे. इमान्युएल चारपेंटीअर आणि जेनिफर डाऊडना यांना हा नोबेल मिळणार आहे. जिनोम एडिटिंगची पद्धत शोधल्याबद्दल त्यांना हा सर्वोच्च सन्मान मिळणार आहे.
जेनिफर यांचा अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १९६४ मध्ये जन्म झाला आहे. त्या सध्या बर्कले विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तसेच, त्या संशोधकही आहेत. तर इमान्युएल यांचा जन्म फ्रान्समध्ये १९६८ साली झाला आहे. जर्मनीतील बर्लिन येथे असलेल्या मॅक्स प्लँक युनिट फॉर द सायन्स ऑफ पॅथोजन्स येथे संचालक आहेत.
या दोघींनी नक्की काय संशोधन केले आणि त्याचा जगाला काय फायदा होत आहे, याबद्दल सांगत आहेत प्राचार्य डॉ. किशोर पवार