मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोन दिवसापूर्वीच त्यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रश्मी ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पती उद्धव यांच्यासमवेत कोरोनाची लस घेतली आहे. त्यातच त्यांना आता बाधा झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा येथेच त्या क्वारंटाईन असणार आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे.