मॉस्को – रशियामध्ये बर्ड फ्लू विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना समोर आली असून पोल्ट्रीमध्ये काम करणारे सात लोक संसर्गित असल्याचे आढळले आहे. या संबंधीची माहिती जागतिक आरोग्य संघटना, (डब्ल्यूएचओ ) यांना देण्यात आली आहे. त्यामुळे जगभरातच चिंता व्यक्त केली जात आहे.
सदर विषाणू पहिल्यांदा मानवांमध्ये आढळला असून जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही. यापुर्वी एच ५ एन ८ स्ट्रेन हा विषाणू केवळ युरोप, चीन, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्ये पोल्ट्रीमध्ये आढळला असून हा विषाणू पहिल्यांदाच मानवांमध्ये आढळला आहे.
या भागात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बर्ड फ्लूचा कहर झाला होता. संक्रमित लोकांच्या संपर्कात येणार्या लोकांना शोधले जात आहे. बाधित झालेले सातही जणांची प्रकृती ठीक असून परिस्थिती नियंत्रणात आहे, असे सांगितले जात आहे. संसर्ग झालेल्या मध्य बहुतेक लोक हे पोल्ट्री फार्ममध्ये थेट व्यावसायात गुंतलेले आढळले आहेत. तथापि, बर्ड फ्लूची बहुतेक प्रकरणे वन्य पक्षी स्थलांतरातून दिसून आली आहेत.