नाशिक – नाशिक जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांची सहविचार सभा रविवार दिनांक १४फेब्रुवारी रोजी दुपारी ३-०० वाजता ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयात आयोजित केली आहे. संमेलनाबाबत या बैठकीत साहित्यिकांच्या अपेक्षा, अनुभव जाणून घेण्यात येणार आहेत. संमेलन संयोजन समितीला आलेल्या विविध सूचना पुढील काळात राबविण्यात येतील. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व लेखक, कवी, नाटककार, पत्रकार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. छगन भुजबळ, कार्याध्यक्ष हेमंत टकले, निमंत्रक जयप्रकाश जातेगांवकर यांनी केले आहे.
या साहित्य संमेलनात जिल्ह्यातील साहित्यिकांच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार असून बैठकीसाठी येतांना ज्या साहित्यिकांची ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे त्यांनी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रति सोबत आणाव्यात असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.