नाशिक – ज्येष्ठ पत्रकार आणि भाजपचे मुखपत्र मनोतगचे समन्वयक रवींद्र अमृतकर यांची भाजप प्रदेश किसान मोर्चाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी कृषिमंत्री आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोंडे यांनी ही निवड जाहीर केली आहे.
केंद्रीय आणि राज्यस्तरीय सरकारच्या उपलब्धी आणि बातम्या मनोगतच्या माध्यमातून गेली पाच वर्षे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत होते. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रसिद्धी विषयक कामकाजही अमृतकर यांनी पाहिले आहे. सध्या ते युवान फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत. तसेच, ग्रामीण भागात अल्प उत्पन्न असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना आधुनिक शेती तसेच संघटीत होऊन शाश्वत रोजगाराचे साधन कसे तयार करता येईल यासाठी कार्य करीत आहेत. तसेच, शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करत आहेत.