कवी प्रशांत धिवंदे यांच्या काव्य पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
देवळाली कॅम्प:- देवळाली कॅम्पला ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. येथील विविध स्थलमहात्म्यासह सर्वधर्मीयांची सामाजिक बांधिलकी या वैशिष्ट्यांची सांगड घातलेल्या ‘रम्य देवळाली माझी’ या कवितेतून देवळालीचे प्रतिबिंब पूर्णपणे उमटले असल्याचे गौरवोदगार खा.हेमंत गोडसे यांनी काढले.
येथील कवी प्रशांत धिवंदे यांच्या ‘रम्य देवळाली माझी’ या काव्य पोस्टरचे प्रकाशन ज्ञान मंदिर सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करणात आले. त्याप्रसंगी खासदार गोडसे बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कवी,अभिनेते, गीतकार राजेंद्र उगले होते. द्वाराचार्य डॉ.रामकृष्णदासजी महाराज लहवितकर, रिपाइं नेते विश्वनाथ काळे, पंचायत समिती सदस्य डॉ.मंगेश सोनवणे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया, माजी मुद्रांक जिल्हाधिकारी भीमराव धिवरे, प्रा.सुनीता आडके, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मीना पाटील, आर.डी.जाधव, चंद्रकांत गोडसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणातून राजेंद्र उगले यांनी प्रशांतच्या रूपाने देवळालीत साहित्य चळवळ सुरू असून भविष्यात त्यांची कविता अधिक प्रगल्भ होईल, असे सांगून त्यांनी आपली ‘बाप सोडून जाताना’ ही रचना सादर करत उपस्थितांना भावविभोर केले. द्वाराचार्य डॉ.रामकृष्णदासजी महाराज लहवितकर यांनी कविता कशी असावी, याविषयी धार्मिक व शास्त्रीयदृष्ट्या माहिती दिली. त्यांच्या हस्ते प्रशांत धिवंदे यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला. सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर तर आभार जीवन गायकवाड यांनी मानले. ऍड.अशोक आडके, कवी प्रशांत केंदळे, प्रशांत कापसे, शैलेश भालेराव, सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक हेमंत मोजाड, रमेश टिळे, नरेंद्र टिळे आदी उपस्थित होते.