कोझिकोड – वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून केरळमधील करिपूर येथील विमानतळावर पावसामध्ये शुक्रवारी रात्री लँडिंग करत असताना एअर इंडियाचे विमान रनवे वर घसरले. त्यानंतर हे विमान थेट ३० फुटाहून अधिक खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले तर १७ जण ठार झाले. त्यात दोन्ही वैमानिकांचा समावेश आहे. विमानात एकूण १९१ प्रवासी होते. १२५हून अधिक जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकांनी कार्य सुरू केले. रात्री अकरा वाजेपर्यंत हे बचावकार्य पूर्ण झाले. डोंगराळ प्रदेश असलेल्या करिपूर येथील रनवे हा टेबल टॉप आहे. म्हणजेच, रनवे लगत खोल दरी आहे. पावसामुळे धावपट्टी ओलसर होती. त्यामुळे विमानाची चाके रनवे वरुन घसरले. वेग अधिक असल्याने घसरलेले हे विमान थेट दरीत कोसळले. विमानाचे पायलट कॅप्टन दीपक वसंत साठे हे सुद्धा ठार झाले आहेत. ते हवाई दलात वैमानिक होते. या विमानतळावर आतापर्यंत चार विमानांच्या दुर्घटना घडल्या आहेत. हे विमानतळ डोंगर कापून साकारण्यात आले आहे. जखमी असलेल्या १२५ पैकी १५ जण गंभीर आहेत.