१९ फेब्रुवारी रोजी साजरा होत असलेल्या रथसप्तमी आरोग्य सप्तमी किंवा अचला सप्तमीचे आपल्या धार्मिक सणांमध्ये विशेष महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांमध्ये निसर्ग उपासना ही केंद्रबिंदू आहे. विविध पद्धतीने आपल्या सर्वच सणांमध्ये निसर्गातील प्रत्येक घटका प्रति आपण कृतज्ञता व्यक्त करतो.
रथ सप्तमी हा सण माघ शुक्ल सप्तमी दिवशी साजरा केला जातो. सूर्याचे उत्तरायण यावेळी सुरू असते नवग्रहांतील सर्वात तेजस्वी तारा म्हणजे सूर्य संपूर्ण जीवसृष्टी ही सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून आहे. आपलं जीवनच सूर्योदयाला सुरू होते व सूर्यास्ताला संपते.
आदिती व कश्यप ऋषी यांच्या पोटी आजच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला अशी पौराणिक कथा सांगितली जाते. रथसप्तमी दिवशी पहाटे स्नानानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी हळद कुंकू अक्षदा दूर्वा घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. अर्ध्याच्या धारेतून सूर्यदर्शन करावे सूर्याच्या बारा नावांचा उच्चार करून बारा सूर्यनमस्कार घालावेत. सूर्य कवच सूर्य अष्टक आदित्य हृदय कवच स्तोत्र याचे पठण अथवा श्रवण करावे.
पाटावरती सात अश्व रथारूढ असलेली सूर्याची प्रतिमा काढावी. या प्रतिमेला लाल फूल अर्पण करून खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्य आरती करावी. नवग्रह स्तोत्र पठण करावे शक्य असेल तर अंगणामध्ये मातीच्या भांड्यात दूध, तांदूळ, साखर, गाईच्या शेणाची गौरी जाळून त्यावर शिजवून थोडे दूध उतू जाऊ द्यावे.
सूर्य म्हणजे अग्नीदेव. अग्नि म्हणजे ऊर्जा अग्नीवर उतू गेलेल्या या दुध खिरीचाचा अग्नीला आपोआपच नैवेद्य मिळतो. या दिवशी सूर्य स्नान यास विशेष महत्व आहे. यासोबतच गंगास्नान अन्नदान नवग्रह दर्शन हे देखील केले जाते. रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचा प्रतीक आहे.
संपूर्ण सृष्टीचा चैतन्य चालक असलेला सूर्य याला सहस्त्ररश्मी असे म्हटले आहे. त्याच्या रथाचे सात शुभ्रा अश्व सात वारांचे प्रतीक आहेत तर रथाची बारा चाकी ही बारा राशींचे प्रतीक आहेत. सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. सूर्याकडून प्रकाश घेतात, या अर्थाने सूर्य संपूर्ण सृष्टीचा चालक व पालक आहे. आजच्या संक्रांती पासून सुरू झालेल्या हळदीकुंकू समारंभाची सांगता रथसप्तमीच्या दिवशी होते..
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!