मुंबई ः देशातील प्रसिद्ध आणि दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी लेन्सकार्टमधील गुंतवणूक मागे घेतली आहे. २०१६ मध्ये त्यांनी स्टार्ट अप लेन्सकार्टमध्ये १० लाखांची गुंतवणूक केली होती. गुंतवणूक मागे घेताना त्यांना ४.६ टक्के नफा झाला आहे.
रतन टाटा यांनी अनेक उद्योगांसह स्टार्टअपमध्ये आपली गुंतवणूक केली आहे. एकूण २० स्टार्टअपमध्ये केलेल्या गुंतवणूकीत ओला, ओला इलेक्ट्रिक, क्यूर डॉट फिट, फर्स्टक्राय, अर्बन कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे. रतन टाटा यांची हुरून रीच यादीत सहा हजार कोटींची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे.










