सिडनी – पुरुषांच्या क्रिकेट कसोटीत प्रथमच महिला अम्पायरला जबाबदारी मिळाल्याने मोठा इतिहास घडला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे आजपासून सुरू झालेल्या तिसरा कसोटी सामन्यात ही घटना घडली आहे.हा विक्रम क्लेअर पोलोसॅक यांच्या नावावर नोंदला गेला आहे.
आजचा हा सामना अनेक गोष्टींनी विशेष आहे. मैदानापासून ते खेळाडू, स्टंपपर्यंत प्रेक्षकांपर्यंत सर्व काही सामन्यात गुलाबी-गुलाबी रंगाचे दृश्य दिसत आहे. स्तनांच्या कर्करोग जागरूकता मोहिमेकरिता आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रेक्षक सामन्यादरम्यान गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेत.
ऑस्ट्रेलियाची क्लेअर पोलोसॅक ही महिला आता पुरुष कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये पंचचा पदभार सांभाळणारी पहिली महिला अधिकारी ठरली आहे. न्यू साउथ वेल्समध्ये राहणारी ही ३२ वर्षीय महिला चौथा पंच म्हणून भूमिका साकारत आहे. नाणेफेक दरम्यान ती दोन्ही कर्णधार आणि सामना रेफरीसमवेत दिसली. ऑस्ट्रेलिया
क्रिकेट असोशिएशन व संघाने तिचे अभिनंदन केले.
दरम्यान, यापुर्वी नामीबिया आणि ओमान यांच्यात वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग दोन सामन्यात पोलोसॅकने पुरुष एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिली महिला पंच म्हणून कामगिरी केली होती. काही परिस्थितीत, ऑन-फील्ड पंचने माघार घेतल्यानंतर तिसर्या पंचला क्षेत्रात काम करावे लागते. तसेच चौथ्या अंपायरला टेलिव्हिजन पंच म्हणून काम करावे लागते.