कळवण – दुस-याचा जीव वाचवणे हाच खरा मानवतेचा धर्म आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान होय. म्हणून सर्व दानापेक्षाही रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी शासकीय विश्रामगृह सुरगाणा येथे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी केले.
तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळातील लाॅकडाऊन कालावधी मध्ये रक्तपेढ्या, सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे, वाढदिवस,यांच्या मार्फत
रक्तसंकलनाचे काम थांबले होते.शासकीय रक्तपेढ्यां मध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध होत नसल्याने राज्याचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदानाचे आयोजन करण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनानांना केले होते. यालाच प्रतिसाद देऊन सुरगाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व मेट्रो रक्तपेढी जिल्हा रुग्णालय नासिक व ग्रामीण रूग्णालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी एकुण एकशे एक रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान केले.
यावेळी आदिवासी सेवक चिंतामण गावित, गोपाळराव धुम, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार,नवसू गायकवाड,आनंदा झिरवाळ,डॉ.दिनेश चौधरी,डॉ.कमलाकर जाधव,डाॅ.भास्कर देशमुख, डॉ.विजय पवार,डॉ.प्रविण पवार, शिक्षक रतन चौधरी,लक्ष्मण बागुल, हिरामण चौधरी, एकनाथ बिरारी,दौलत चौधरी,अशोक भोये, धर्मराज महाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जयकुमार माळी, युवराज लोखंडे, भास्कर अलबाड, विजय देशमुख, सखाराम सहारे, धर्माशेठ पाडवी, देवराम धुम, सोनीराम दळवी, योगेश ठाकरे,नरेंद्र दळवी,चंद्रकांत राऊत,शिवा चौधरी, परशराम कडाळी, मधुकर निपुंगळे, एकनाथ पवार,माधव पवार,तुकाराम देशमुख, बाळू तात्या, चंदर भोये,चौधरी तात्या,राजेंद्र गावित आदीसह डोल्हारे, खुंटविहीर,म्हैसखडक, पिंपळसोंड,बा-हे, भवाडा,करंजाळी, भदर,साबरदरा, जामनेमाळ, पालविहीर, बंधारपाडा, रघतविहीर,भिंतघर, पळसन,सुभाषनगर, काठीपाडा, हनुमंतपाडा,कोठुळा, सतखांब,डोल्हारे आदी गावातील युवक रक्तदाते उपस्थित होते.
यावेळी ‘ग्रामीण रुग्णालय सुरगाणा’ व “मेट्रो रक्तपेढी जिल्हा रुग्णालय नासिकचे” रक्तपेढी संक्रमण अधिकारी डॉ. शिवाजीराव लहाडे, वैद्यकीय अधिकारी सुरेश पांढुले,तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर,अमोल भोये,विजय पवार, संगिता सिरसाठ, कल्पना गावित, औषधनिर्माता वैभव काकुळते, संजय थोरात,रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी उदय बस्ते,अनिल जोशी, सागर पगार, राजकुमार मोरे,भरत मोजाड,सतिष वाघमारे आदींनी रक्त संकलनाचे शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.