नाशिक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रविवारी नाशिक जिल्हा शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वतीने कदम लॉन्स, नाशिक रोड येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष सुनील पवार, सचिवज्ञानेश्वर पगार, सहसचिव शाम राठोड, कोषाध्यक्ष राहुल कडलग, जिल्हा समन्वयक संतोष पवार, जिल्हा संघटक संजय बोरसे व सर्व कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. तसेच एस एस सी बोर्ड संघटनेचे सरचिटणीस शालीग्राम चव्हाण, सैनिक फेडरेशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष दिनकर पवार व सहाय्यक लेखाधिकारी गजानन देवचके यांनी सदिच्छा भेट दिली.